सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

मोबीन......तुमच्या आक्षेपाचे उत्तर

मोबीन......      
नाही म्हणता येत नाही ... पण आहेच म्हणता पण येत नाही.......जनरालाइजेशन करु नये ही कृपा.... कारण महाराष्ट्रीयन म्हणजे काय फक्त मराठी येणेच होय का....? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे...तोच राजकीय डाव जो महाराष्टात कित्येक वर्षापासनं खेळला जात आहे....
                      
          सिनेमा पासुन साहित्यापर्यन्त मुसलमानांना दोन प्रकारे दाखवण्यात आलं एक तर फारचं इमानदार किंवा दुसर म्हणजे अट्टल आतंकवादी ...एक प्रकारची छवी म्हणते कि तू असं वागायला हवं दुसरी म्हणते कि तु देशद्रोही आहेस (ह्याकरिता कुठचाही सिनेमा किंवा कादंबर...ी घे) ...मुसलमान हा सामान्य मानसाप्रमाणे कधिच दाखवला गेला नाही ... तो सदा अबनॉर्मेल च राहीला ... काहिसा असामान्य...... ह्याकरिता त्याने अपली देशभक्ति दाखवुन देण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केला ... तुझा मराठी लोकांची मातृभाषा मराठीच म्हणण त्याचाचा एक भाग आहे..... च हे जबरदस्तीप्रमाणे लादल्यासारखं वाटत... त्यापेक्षा असं म्हणता येणार नाही का कि महाराष्ट्रीयन मुसलनांची पण आहे मराठी...
मुफिद  मुजावर ....
                        मोबीन........तुमची  मुद्दा समजून घेताना गल्लत होते आहे. मुद्दा मराठी अस्मितेचा किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुळीच नाही.  मराठी मुसलमान असणे ही फक्त भाषिक अथवा प्रादेशिक अस्मितता नव्हे. हिंदू राष्ट्र स्थापनेचे  ध्येय समोर ठेवून सांस्कृतिक राजकारण करणारे आणि गुजरातचा नरसंहार घडवणारे हिंदुत्ववादी, मुसलमानांना एकगठ्ठा व्होट बँक मानणारे आणि त्यांना सतत असुरक्षित असण्याची जाणीव करून देणारे  तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी, इस्लामच्या नावाखाली सर्व मुस्लिमांची अस्मिता आणि हितसंबंध  एकच आहेत त्यामुळे त्यांनी जिहाद करावा असे  सांगणारे आणि इस्लामच्या नितीमुल्यांच्या उलट निशस्त्र  आणि निष्पाप  लोकांचे प्राण घेणारे मुलतत्ववादी दहशदवादी आणि इस्लामी दहशदवादाच्या नावाखाली अफगानिस्तान आणि इराक़वर युद्ध लादून लाखो निष्पाप लोकांचे प्राण घेणारे साम्राज्यवादी भांडवलदार राष्ट्रे यांचे एका मुद्द्याबाबत एकमत स्पष्टपणे दिसून येते.  तो म्हणजे जगभरातील सर्व मुसलमान हे एकच  एक  अशी एकसंघ (homogenious ) घटक आहे व त्यांची एकच अस्मिता आहे, त्यांची हितसंबंध एकच आहेत असे वर उल्लेखिलेले घटक मानतात. हे घटक जगभरातील विविध राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक, आर्थिक , भाषिक, वांशिक, परिवेशात राहणाऱ्या मुसलमानांचे हितसंबंध एक काच आहे असे सतत दाखवीत असतात.  हे घटक विविध राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक, आर्थिक , भाषिक, वांशिक परीवेशामुळे असणारे हितसंबंध, अस्मिता, रोजच्या जीवनातील प्रश्न या मुलभूत घटकाकडे दूरलक्ष्य   करतात.  मुसलमानान मध्ये वांशिक, भाषिक फरक आहेत ही गोष्ट ते लपून ठेवतात. भारतीय मुसलमाना मध्ये जातीव्यवस्था आहे हे सत्य ते मान्य करत नाहीत. मराठी मुसलमान ही ओळखीकडे   या सर्व बाबी लक्ष्यात घेऊन पहिले पाहिजे.

रविवार, २१ नोव्हेंबर, २०१०

मराठी मुसलमान: महाराष्ट्रातील मुस्लिमांची मातृभाषा मराठीच.........

मराठी मुसलमान: महाराष्ट्रातील मुस्लिमांची मातृभाषा मराठीच.........: "मुफिद मुजावर -

महाराष्ट्रातील मुस्लिमांची मातृभाषा मराठीच........

मुफिद मुजावर -

महाराष्ट्रातील   मुस्लिमांची  मातृभाषा  मराठीच........

मुस्लिमांची   मातृभाषा  उर्दू  आहे -

मुस्लिमांची  मातृभाषा  ही  उर्दू  आहे  असा  गैरसमज    समाजात  पसरवला  गेला  आहे .  आणि  मुस्लिमांना  देखील  तो  खरा  वाटतो . भाषेतील  फरकाच्या  माध्यमाने   समाजाच्या  एका  भागाला  समाजापासून  तोडण्याचा  प्रयत्न  केला  जातो . मुस्लिमांची  मातृभाषा  उर्दू  आहे  या  गैरसमजामुळे     मुस्लीम  समाजाला  मुख्य  समाजापासून  तोडण्याचा  प्रयत्न  सांप्रदायिक  शक्ती  करतात  यात  काही  मुस्लीम मुलतत्ववादि    देखील  शामिल  आहेत . पण  महाराष्ट्रातील  मुसलमानांच्या    घरात  जी  भाषा  बोलतात  ती  उर्दू  नसून  ती  दक्खनी  भाषा  आहे . ती  मराठी , फारसी ,हिंदी , उर्दू  इतक्या  भाषांच्या  मिश्रणाने  बनली  आहे  पण  ती  उर्दू  नाही . महाराष्ट्रातील   मुसलमान  हा  बाहेर  मराठीच  बोलतो  आणि  तीच  त्याची  मातृभाषा  आहे .
 
 
मुबीन-
बहुत  आछे   मुफिद  जी  

साकीना-

अगदी बरोबर... मुफिद

सर्वप्रथम हा विषय मांडल्याबद्दल मी तुझे आभार मानते. अनेक महाराष्ट्रीयन मुस्लिमांची मातृभाषा ही मराठीच आहे. परंतु, काही जणांनी मुद्दामहून ती उर्दू असल्याचा गैरसमज पसरविला आहे. पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दू झाल्यावर उर्दूला मुस्लिम भाषा म्हणून संबोधले गेले. खुद्द २० कोटी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानात फक्त ५ कोटी जनतेची मातृभाषा उर्दू आहे. म्हणून, उर्दू मातृभाषा नसतानाही मुस्लिमांनी ती लादून घेऊ नये. दक्षिण भारतीय मुस्लिमांना उर्दूचा गंधही नाही. डॉ. अब्दूल कलाम, ए.आर. रेहमान, एम. जे. अकबर ही त्याची मूर्तीमंत उदाहरणे आहेत. तेथील मुस्लिम तिथलीच भाषा बोलत असल्याने सर्वसामान्य जनतेत मिसळून वागतात. असे अन्य भारतात विशेषत: महाराष्ट्रात होत नाही. अगदी बंगालमध्येही मुस्लिम हे कट्टर बंगाली आहेत! महाराष्ट्रीयन मुस्लिम मात्र उर्दूला कवटाळून बसतात. ही परिस्थिती बदलायला हवी. तरच मुस्लिम व अन्य समजातील तेढ कमी होण्यास मदत होईल...

 

मुफिद मुजावर-

असे  काही  ज्यावर  परत  विचार  करू .....

मी  तुमच्या  म्हणण्याशी  सहमत  आहे .....
पण  तुम्ही  मांडलेल्या  उर्दू  संदर्भातील     महाराष्ट्रातील   मुस्लिमांच्या बाबतच्या   मतशी  मी  सहमत  नाही ......
आपण  महाराष्ट्र   न  म्हणता  ऐतिहासिक   दृष्टीकोनातून  यावर   विचार  मांडण्यापुरता  दक्खन   असा  विचार  करू ...
मध्ययुगात  दक्खनच्या  भूप्रदेशावर यादव  काळानंतर  दिल्ली   सल्तनतची  सत्ता  आली . त्यात  फुट  पडल्यानंतर ..... बहामनी  सत्ता  आली ... बहामानीत  फुट  पडल्या  नंतर  आदिलशाही ,निजामशाही ,इमादशाही ,बरीद्शाही   इत्यादी  सत्ता  स्थापन   झाल्या . या  सत्तांचे  वैशीष्टय  म्हणजे  या  सर्व  सत्तांनी    दक्खनच्या  विशीष्ट  भूप्रदेशाला  आणि  समाजजीवनाला  अनुसरून  त्यांच्या  राज्य  कारभाराची  घडी  बसवली  यातील  राजकारण  आणि  समाजकारण  यांच्या  कडे   उर्दू - मुसलमान - मराठी  असे  पहिले  तर  काही  गोष्टी  लगेच  लक्षात  येतात . दक्खनच्या  या  सर्व सत्तांमध्ये  धर्माने मुस्लीम  असलेले राज्यकर्ते होते तरी या  सत्तांमधील   कारभार  हा  उर्दूत  चालत  नव्हता. तो  फारसी  मध्ये  चालत  होता...इतकेच  नव्हे  तर  अगदी  पेशवे  काळात  इस्ट  इंडिया  कंपनी  आणि  मराठे  यांचा  पत्रव्यवहार  फारसीतून  चालत  होता . असो ... या  शाह्यानी  दिलेली  फर्माने , पत्रे , ही  एक  तर  फारसीत  आहेत  अथवा  मराठीत  आहेत .... आदिलशाहच्या  काही  फार्मानांची  सुरवात  ही  शारदा  स्तवनाने  होते .... आदिलशाहला  भेटायला  आलेल्या मुघल  वकीलाला  आदिलशाह  ने , "मला  फारसी  थोडी  थोडी  समजते .... पण  मला  मराठी  जास्त  चांगली  येते " असा  उल्लेख  आढळतो ...... कुतुबशाहने   आदिलशाहला  लिहिलेले  एक  पत्र  हे  मोडी  लिपीत  असून  ते  फारसी  भाषेत  आहे ..... दक्खनमध्ये  जे  मुसलमान  संत  कवी  झाले ...त्यातील  मराठी  भाषिक  प्रदेशतील  संत  कवी  हे  मराठीतूनच  लिहित  होते ... अधिक  माहिती  करता  रा . चिं. ढेरे  यांचे  मुसलमान  मराठी  संत  कवी हे  पुस्तक  पहा.  त्या  काळात  मराठी  बरोबर  फारसी  भाषा  चलनात  होती ... त्याच्या  मिश्रणातून  दक्खनी   बनली ...या  साठी  वि.का..राजवाडे  यांच्या  ऐतिहासिक  प्रस्तावना  पहा .....महाराष्ट्रातील  मुसलमान  आज  घरात  बोलतो  ती  हीच  दक्खनी  ... जी  त्याला  तर  कळतेच  पण  त्याच्या   शेजारच्या  मराठी  माणसाला  देखील  कळते ...जशी  मराठी  माणसाला  हिंदी  अवघड  वाटते  त्याला  मात्र  ही दक्खनी   इतकीशी   अवघड  वाटत  नाही ... याचे  उदाहरण   म्हणजे  महात्मा  फुले  आणि  संत  तुकाराम  यांच्या  लिखाणात  आलेली  दक्खनी भाषा.  
            कधी  तरी  लक्ष   देवून  अशोक  सराफ , सदाशिव  अमरापूरकर  या  लोकांची  हिंदी  ऐका  ...तिचा  बाज  लगेच  लक्ष्यात  येईल ... असो  फारसी  आणि  मराठी  या  भाषा  असताना  उर्दू  ही  कधी  आली  हा  प्रश्न  उरतोच ... उर्दू  ही  मुघलांच्या   बरोबर  आली .. ती  मुघल  सैन्यामध्ये  बोलली  जाणारी  भाषा  आहे . त्यामुळे  ती  एक  सैनिकी  भाषा  आहे  जिचा  इस्लामशी  संबंध  नाही. मराठी  भाषेत  जे  फारसी  शब्द  होते  त्यांना  काढून  टाकण्याचे  काम  इंग्रजांच्या  काळात  मराठी  विद्वानांनी  केले. या  काळातील  त्यांच्या  मूलतत्ववादाचा  आणि जमातवादाचा  प्रभाव त्यांच्या मतांवर पडला त्यामुळे   त्यांच्या  मते ...मराठी  आणि  फारसी  यांच्यात  संघर्ष  होता  आणि  मराठीवर  फारसीने  प्रभुत्व  गाजवले  आणि  त्यामुळे  मराठीतून  शक्य  तितके  फारसी  शब्द  काढणे  आवशक  आहे ... त्यांनी  फारसीला  मुस्लीमराज्यकर्त्यांची  भाषा  म्हणून  परकीय  ठरवले ... म्हणजे  तत्कालीन  अस्मितेच्या  राजकारणासाठी  फार्सीला  मुसलमानाची  आणि  म्हणून  परकी  भाषा  ठरवले .... स्वतंत्र  लढ्याच्या  काळात  मुस्लीमलीगने  उर्दूला  मुसलमानांची  भाषा  म्हणून  पुढे  केले ... त्याचा  वापर  महाराष्ट्रातील  जातीवाद्यानी  केला  . म्हणजे  हिंदुत्ववादी हे   मुसलमानाची  भाषा  उर्दू  आहे  म्हणून  ते  परकीय आहेत असा प्रचार करतात   .. आणि  मुसलमान  कट्टरवादी  जे  मुख्यतः  उच्चवर्गातून  आलेले  आहेत  व  ज्यांचा   रोजच्या  व्यवहारात   सर्वसाधारण  लोकांशी  तितका  संबंध  येत  नाही  त्यांनी  आपली  भाषा  उर्दू  आहे  असा  घोषा लावला ... तरी  सुद्धा सामान्य  आणि  गावगाड्यातील मुसलमान .... जो  खाटिक , मुलाणी , पिंजारी  , अन्सारी , जुलाहा , शिकलगार , बागवान , मुजावर , तांबोळी  होता  त्याचा  सर्वसामान्यांशी  संबंध  होता  आणि  त्यात  मराठीशिवाय  इतर  कोणती  ही  भाषा  उपयोगाची  नव्हती  त्यामुळे  तो  मराठीच  बोलत  होता .... अस्मितेच्या  राजकारणा  पेक्षा .... मराठी  कडे  आणि  मराठीच्या  वापरा  कडे ...उर्दू  चे  राजकारण ..त्या  मागचे  हितसंबंध ...राजकारण .. याच  बरोबर  बदलत  जाणारा   आणि  तितकेच  क्रूर  होत  चाललेला   जमातवाद  या  सर्वांचा  विचार  करणे  आवशक  आहे ... उर्दू  ही  एक  सुंदर  आणि  गोड  भाषा  आहे ... पण  ती  मुसलमान  आहात  म्हणून  तुम्ही  तीच  बोला  आणि  तीच  शिका  असे  म्हणणे  चूक  आहे .... त्याच  प्रमाणे  तुम्ही  हिंदू  आहात  आणि  उर्दू  मुसलमानांची  भाषा  आहे  त्यामुळे  तुम्ही  ती  शिकू  नका  असे  म्हणणे  देखील  चूक  आहे ....