मंगळवार, १५ मार्च, २०११

"अरबांचा इन्तीफादा-२०११"

          डिसेंबर २०१०  पासून सुरवातीला छुटपूट  नागरी विरोधप्रदर्शनाप्रमाणे जाणवणारे आणि नंतर  युवकांच्या प्रचंड आणि आश्चर्यजनक सहभागाने  जनालढाचे रूप प्राप्त केलेल्या आंदोलनाने  जानेवारी २०११ मध्ये  ट्युनिशियावरील बेन अलि आणि त्याच्या साथीदार- नातेवाईक यांच्या   जवळपास २३ वर्षाच्या अनिर्बंध, जुलमी, भ्रष्ट आणि अमेरिकन सरकारचा पाठींबा  असलेल्या सत्तेचा शेवट झाला.  त्याचा परिणाम आजूबाजूच्या प्रदेशात जाणवू लागला. इजिप्तमधील जनतेने तहरीर  चौकात उभारलेल्या  जनआंदोलनाने अमेरिका आणि इस्ज्रायल युतीचा भक्कम पाठींबा असलेले होस्नी  मुबारक चे सरकार उलथून टाकले.  इजिप्त मधील आंदोलनाचे मुद्दे  देखील  ट्युनिशियाप्रमाणेच होते. इजिप्तिशिअन जनता ही अन्वर साद्दात यांच्या हत्येपासून लागू केलेल्या आणीबाणी कायदा आणि त्याद्वारे होणारा पोलीस आत्याचाराविरुद्ध पेटून उठली तिला  ट्युनिशियाच्या "जास्मिन क्रांती"ने प्रेरणा दिली . भ्रष्टाचार, विचारस्वातंत्र्य, मुक्त निवडणुका , महागाई आणि अत्यंत कमीप्रमाणात मिळणारा कामाचा मोबदला या मुद्द्यांना  घेऊन  इजिप्त मध्ये सत्तांतर झाले, इजिप्त मधील या  "अठरा दिवसांच्या क्रांती" मुळे उत्तरआफ्रिका आणि मध्यआशियातील अनेक देशातील जनतेने आपापल्या अमेरिकेच्या पाठींब्यावरच्या,अनिर्बंध, भ्रष्ट आणि जुलमी सत्ताधीशानविरुद्ध   आंदोलने सुरु केली आहेत. लिबिया, येमेन, इराण, इराक़, बहारीन, अल्जिरिया, जॉर्डन,  सिरीया इत्यादी देशात
आंदोलने सुरु झाली आहेत.
   




        ट्यूनीशिया मध्ये  बेन अली याची २३ वर्षा पासून सुरु असलेली अनिर्बंध सत्ता ही दडपशाही, निवडणुकांचा   फार्स, आणि अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी मदतिवर टिकून होती. बेन अली हा अमेरिकेच्या वार ऑन टेर्रोरचा उत्तर अफ्रीका मधील सर्वात जवळचा  सहकारी होता. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, विचार स्वातंत्र्याचे दमन, पोलिसांचा वापर करुन केलि जाणारी दड़पशाही   या विरुध असंतोष मजला होता. नवउदारमतवादी आर्थिक धोरणे ट्यूनीशिया मध्ये  राबविण्याचे श्रेय बेन  अलीलाच जाते आणि त्याचा सर्वात मोठा फायदा देखिल त्यालाच झाला. त्याच्या या हुकुमशाहीविरुद्ध पाश्च्यात   मिडियाने  .आणि एनजीओनी ब्र देखील काढला नाही. अमेरिका आणि इंग्लंड  स्वातंत्र्य(?) आणि लोकशाहीसाठी(?) जगभरात युद्धे  करत होती तरी त्यांना  ट्यूनीशिया मधील जनतेसाठी   थोडीशी हालचाल करावी असे वाटले नाही. याचे कारण म्हणजे बेन अलि ने स्वीकारलेली नवउदारमतवादी आर्थिक धोरणे हेच होय.सत्ता ताब्यात आल्यानंतर आपले नातेवाईक आणि हितसंबंधी यांच्यात राजकीय सत्ता आणि आर्थिक सत्ता यांचे बेन अलिने पद्धतशीर वाटणी केली. त्याने आपले   नातेवाईक  आणि हितसंबंधी याचा असा राजकीय वा आर्थिक सत्ताधारी वर्ग निर्माण केला. आणि सर्व फायदे या वर्गालाच मिळत  गेले.  त्यामुळे नव्या धोरणांचा फायदा होत आहे असे वर वर दिसले तरी ते जनतेपर्यंत कधी ही पोहचले नाही. महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव, प्रचंड प्रमाणात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि प्रचंड संखेने वाढलेली बेरोजगारी यांचा एकत्रितपणे साठलेयाल्या आणि ठोसून भरलेल्या  असंतोषाचा उद्रेक  एक ठिणगी पडताच झाला.  ट्यूनीशियातील एका तरुणाने बेरोजगारी आणि उपासमार  यांना कारणीभूत असलेल्या सत्ताधार्यांना विरोध म्हणून स्वताला पेटवून घेतले. या घटने नंतर ट्यूनीशियाच्या शहरा-शहरात सरकारविरोधात निदर्शने सुरु झाली. बेन अलिने पोलीस आणि लष्कर यांच्या मदतीने  जनआंदोलन हे दंगल आहे असे भासवून दडपशाही सुरु केली. मात्र  ट्यूनीशिया च्या जनतेने माघार घेतली नाही. शेवटी १४ जानेवारी २०११रोजी बेन अलि ला ट्यूनीशिया सोडून सौदी अरेबिया मध्ये परागंदा व्हावे लागले.  अजून ट्यूनीशिया च्या जनतेचा संघर्ष संपला नाही. तात्पुरत्या सरकारमधील सर्व मंत्री हे बेन अलीच्या सत्तेतीलच आहेत त्यामुळे अजून देखील हा लेख लिहित असताना देखील तिथे निदर्शने सुरु असल्याच्या बातम्या येत आहेत. ट्यूनीशियातील या सत्तांतरला  "जास्मीन  क्रांती" असे संबोधले गेले आहे.





          ट्यूनीशिया मध्ये  हुकुमशाही सत्ताधीशा विरुद्ध जनता असा संघर्ष पेटू लागताच त्याचे पडसाद इजिप्त  मध्ये देखील  उटू   लागले. एकेकाळी अब्दुल गमाल नासर यांच्या नेतृत्वाखाली समस्त अरब जनतेच्या धर्मनिरपेक्ष आणि इस्लाम मधील समतेच्या तत्वावर आधारलेल्या समाजवादी अरब राष्ट्रवादाचे इजिप्त हा उगमस्थान होता. या अरब राष्ट्रवादाने मध्य  आशियातील  अनेक राजेशाही राजवटी मुळापासून उखडून टाकल्या. प्यलिस्तनिअन अरबांच्या ज्यात धर्माने मुस्लीम असो वा ख्रिचन असो सर्व पलेस्तनिअन अरब आपल्या मातृभूमी/ पितृभूमी पालेस्तैने साठी संघर्ष करत होते त्यांना नासरच्या नेतृत्वाखाली  अरब राष्ट्रवादाने भारावलेल्या अरब राष्ट्रांनी आणि त्यातील जनतेने सक्रीय पाठींबा दिला. या अरब राष्ट्रवादाला खिंडार    पाडून   पलेस्तनिअन जनंतेच्या  स्वातंत्र्यलढ्याला  दडपण्याचे  कुकर्म  नवसाम्राज्यवादी    अमेरिका  आणि झीओनिस्त  इस्राइलने  केले. याद्वारे कुवैत, सौदी अरेबिया, जॉर्डन येथील राजेशाहीना हाताशी धरून तेलावर कब्जा मिळवला. अन्वर सद्दातने इस्राइलशी करार करून पलेस्तनिअन जनतेला दगा दिला. सिरीया लेबनॉन येथे अमेरिकेच्या कारवायांमुळे यादवी माजली. इसारेलशी करार केल्या मुळे अन्वर सादातची हत्त्या झाली. मात्र   सद्दातच्या  हत्त्येनंतर   सत्तेवर आलेल्या होस्नी मुबारक ने अमेरिका आणि इसारेलला पाठींबा देण्याचे धोरण चालू ठेवले. याचा फायदा मूलतत्ववादी  संघटनांनी घेतला आणि काही प्रमाणात लोकांना प्याण  अरब राष्ट्रवादाकडून  प्याण इसलाम कडे आकृष्ट केले. जे अंतिमतः अमेरिकेच्या इस्लामला  एकजीनशी  ठरवण्याच्या कारस्थानाला पूरक ठरले. सौदी राजा आणि होस्नी मुबारक यांच्या सारख्या आपल्या प्यादयांच्या  मदतीने अमेरिकेने  इराक़वर  हल्ले केले आणि इराक़ला  आपल्या नववसाहतवादाचा बळी बनविले. होस्नी मुबारक ने इजिप्त मध्ये आणीबाणी कायदा लागू करून दडपशाही ने आपले सरकार टिकवले.नवउदारमात्वादाचा स्वीकार करून इजिप्त ची बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली केली. इसारेलला ग्यास आणि तेलाचा पुरवठा सुरु केला. या विरुद्ध उत्थाणारा प्रत्येक आवाज दाबून टाकला. इजिप्त मधील सरकारी मालकीच्या कंपन्यांचे खाजगीकरण करून त्याची मालकी आपल्या हितासाम्बंधीना मिळेल याची व्यवस्था केली.त्यामुळे इजिप्त मधील साधन संपत्ती आणि उत्तपादानाची साधने यावर होस्नी मुबारकचे हितसंबंधी आणि परकीय भांडवलदार यांचा कब्जा झाला. इजिप्त मधील सरकारी कंपन्यांची मालकी भांडवलदारांकडे येताच कामगारांच्या मोबदल्या बरोबरच  त्यांच्या राजकीय निर्णय प्रक्रियेवर देखील त्यांची वर्चस्व प्रस्थापित झाले. या सर्वां विरुद्ध असंतोष वाढतच होता. बेरोजगारी, कमी पगार, दारिद्र्य राहणीमान, राजकीय दडपशाही ही इजिप्तिअन आणि समस्त अरब जनतेची खरी समस्या असून देखील नव साम्राज्यवादी अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष हे बदलच्या (CHANGE) नावाखाली कैरो मध्ये दहशतवाद हीच मुख्य  समस्या असल्याचे आपल्या भाषणात सांगून गेले. स्वातंत्र्य आणि लोकशाही या साठी लढणाऱ्या अमेरिकेची सर्वात जास्त लष्करी मदत पलेस्तनिअन जनतेचे शिरकाण करणाऱ्या इसारेल ला आणि त्याखालोखाल आपल्याच जनतेवर दडपशाही करणाऱ्या इजिप्तला केली जाते. शेवटी नवसाम्राज्यावाद्यानी आणि त्यांच्या हस्तक मिडिया ने कितीही खोटारडा अपप्रचार  केला तरी इजिप्तिअन  अरब जनतेने आपल्या भौतिक समस्यांवर होस्नी मुबारक विरुद्ध आंदोलन सुरु केले. तहरीर चौकात २५ जानेवारी  पासून सुरु झालेल्या जनआंदोलनाने पोलिसांच्या , लष्कराच्या  , होस्नी मुबारक समर्थक गुंडांच्या हल्ल्याला तोंड देत माघार घेतली नाही. या रणसंग्रामात अनेकजन शहीद देखील झाले







. १८ दिवसांच्या आंदोलना नंतर परीस्तीती हात बाहेर गेली आहे हे पाहून होस्नी मुबारक सत्तेवरून पाय उतार झाला. इजिप्तिअन जनतेने दडपशाही राजवट जन आंदोलनाद्वारे उलथून टाकली आहे. या घडीला हा लेख लिहित असताना इजिप्तची सत्ता ही लष्कराच्या हाती आली आहे. इजिप्तिअन जनतेने लोकशाही हक्कांसाठी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. 

 

           इजिप्त पाठोपाठ एकेकाळी अमेरिकेचे शत्रू असलेले लीबियाचे अध्यक्ष मुअम्मर गडाफी यांच्या विरुद्ध देखील सशस्त्र उत्तव सुरु झाला आहे. लिबिया मध्ये संघर्ष सुरु  असला तरी इजिप्तच्या मुबारक राजवटी बाबत मुग गिळून बसलेल्या अमेरिका आणि युरोपिअन संघाला  अचानक कंठ फुटला आहे. त्यामुळे आणि लिबिया वरून येणाऱ्या बातम्या या पूर्णपणे वस्तुनिष्ठ आहेत या बाबतीत खात्री देता येत   नसल्यामुळे या लेखात त्याबद्दल मत व्यक्त करता येत नाही. पण आता पर्यंत बंडखोरांनी लिबियाच्या उत्तरेकडील बेनगाझी सहित काही शहरांचा ताबा घेतल्याच्या आणि गडाफी विरोधक आणि गद्दाफी समर्थक यांचात रक्तरंजित चकमकी होत असल्याच्या बातम्या येत आहेत.          
        मात्र अरब जनतेने ट्युनिशिया आणि इजिप्तमध्ये जन आंदोलन करून जुलमी सत्ता उलथून टाकून अनेक गोष्टी सद्य केल्या आहेत . आपले भौतिक प्रश्न हेच महत्वाचे आहेत हे त्या जनतेने दाखून दिले आहे..  या अरबांच्या इन्तीफादा २०११ मुळे सर्व जगभर एक प्रचंड घुसळण सुरु झाली आहे. सत्तेच्या जोरावर जनतेचा आवाज दाबनार्यांचे आणि त्यांना समर्थन देणाऱ्या साम्राज्यवाद्यांचे धाबे दणाणले आहेत.इ.स.  २०११ मध्ये अरब जनतेने बेरोजगारी, महागाई , भ्रष्टाचार ,विचारस्वातंत्र्य, राजकीयस्वातंत्र्य आणि मुख्य म्हणजे अत्यंत दरिद्रीजीवनमान या भौतिक प्रश्नांवर संघटीत होऊन  यशस्वी संघर्ष केल्यामुळे संपूर्ण मध्य आशियात "इन्तीफादा" (उठाव) सुरु झाला आहे. नवी आर्थिक धोरणे राबवत अमेरिका आणि इस्ज्रायल युतीला सोयीस्कर धोरणे स्वीकारणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तडाखा बसला आहे.  मुस्लिमांची आणि अरबांची नवसाम्राज्यवाद्यांनी दहशतवादी म्हणून उभी केलेली प्रतिमा आताच्या आमच्या तरुण पिढीच्या मनावर  आहे. आमच्यातल्या काही तरुणांना "अरब" म्हटला की ४-५ बायका असलेला, कट्टर दहशदवादी, बायकांना बुरक्यात ठेवणारा , आणि तेलाच्या पैशात लोळणारा जंगली मनुष्य वाटतो.    बहुतेक जणांना प्रत्येक अरब किंवा मुस्लीम हा दहशतवादी वाटतो.. त्यांना अरब राष्ट्रवादाची चळवळ माहित नाही.त्यातील साम्राज्यवाद विरोधी गाभा माहित नाही. ही पिढी समुएअल हनिन्ग्तोनच्या क्लाश ऑफ सीविलाइझेशिंयन च्या मिथकला मिडिया आणि न्यानशाखेतून रिचवत मोठी झाली आहे. तिला साम्राज्यावाद्यानी सुरु केलेल्या वार ऑन टेर्रर ची पार्श्वभूमी आहे.त्यांचा मनात भांडवली साम्राज्यावाद्यानी उभ्या केलेल्या   मिथकांना  "अरबांच्या इन्तीफादा" मुळे तडे जाणे सुरु झाले आहे.   या सर्व मिथकांना अरब तरुणाई ने ज्यात तरुण आणि तरुणी सामील आहेत, त्यांनी जेअन्स आणि  टी शर्ट या पेहरावात हातात मोबाईल  फोन  घेऊन फेसबुक  आणि ट्वीटर  माध्यमाने एकमेकांशी संपर्क साधून , मोठ्या संखेने  एकत्र येऊन नव्या डावपेचांचा वापर करीत जुलमी सत्ताधाऱ्यांना पद भ्रस्त केले आहे.  भौतिक प्रश्नावर एकत्र आलेल्या वेगवेगळ्या अरब देशातील अरबजनतेने "लोक फक्त धर्मासाठी एकत्र येतील आणि संघर्ष करतील" असे म्हणणार्यांचा सपशेल पराभव केला आहे. आणि युवा  पिढीला शोषणाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा